Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महा जानदेशयात्रा : शिवसेनेचा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी दिला नाणारच्या पुनर्विचाराचा शब्द !!

Spread the love

मुळात शिवसेना आणि भाजपमध्ये येऊ घातलेले नारायण राणे यांच्या विरोधाची पर्वा न करता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा सरकार फेरविचार करणार असून या प्रकल्पामुळे १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे दिसत आहेत. राजापूर येथे महाजनादेश यात्रेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.

यावेळी उपस्थित जनसमुदाय पाहून मौके पे चौका  मारताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , नाणारमध्येच रिफायनरी झाली पाहिजे, हे मी घसा फोडून सांगत होतो. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. मात्र ज्याप्रकारे या प्रकल्पाला विरोध झाला त्यामुळे हा निर्णय थांबवण्यात आला होता. पण इथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय, असं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे कोकणातील १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे, असं सांगतनाच आज या प्रकल्पाबात कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी या संदर्भात तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नाणारचा फेरविचार करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने या प्रकल्पावरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनीही या प्रकल्पाला विरोध केला होता, त्यामुळे ते याबाबत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागले असून विधानसभा निवडणुकीत नाणार प्रकल्प गाजण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरीला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरीत गेल्या पाच वर्षातील सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडतानाच भविष्यातील संकल्पही बोलून दाखविले. सिंधुदुर्गाप्रमाणेच रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा घोषित करण्याची वारंवार मागणी होत होती. त्यामुळे रत्नागिरीला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात येईल हे मी आजच घोषित करतो, असं फडणवीस म्हणाले. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि उद्योग आले पाहिजेत. इथल्या तरुणांना रोजगार मिळाले पाहिजेत म्हणून त्यावर काम सुरू आहे, असं सांगतानाच पाऊस संपल्यावर मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू करण्यात येणार असून हा महामार्ग कोकणाच्या पर्यटनाची लाइफलाइन ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

रत्नागिरीच्या विमानतळाचा विकास करण्यात येणार आहे. उडान ३ मध्ये रत्नागिरीचा समावेश करण्यात आला आहे. या विमानतळाच्या विस्तारिकरणाचं काम झाल्यानंतर रत्नागिरीतून थेट विमान देशाच्या इतर भागात जाईल. त्याचा रत्नागिरीच्या पर्यटनाला फायदाच होणार असल्याचं ते म्हणाले. २०२१ पर्यंत राज्यात एकही बेघर राहणार नाही, प्रत्येकाला घर मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!