Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद : महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी उदघाटन

Spread the love

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेतर्फे औरंगपुरा येथे उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे उदघाटन राज्यमंत्री उद्योग व खणीकर्म  अतुल सावे व शिवसेना नेते  चंद्रकांत खैरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी  वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष डॉ भागवत कराड,  महापौर श्री नंदकुमार घोडले ,स्थानिक स्वराज्य संस्था आमदार  अंबादास दानवे,उपमहापौर श्री विजय औताडे, माजी महापौर  त्र्यंबक तुपे, गजानन बारवाल,  बापू घडामोडे, सभागृह नेता  विकास जैन, स्थायी समिती सभापती   जयश्री कुलकर्णी, भाजप गटनेता   प्रमोद राठोड, उपसभापती महिला व बाल कल्याण समिती शोभा बुरांडे, स.नगरसेविका कीर्ती शिंदे,  बबिता चावरीया, माजी सभापती महिला व बाल कल्याण समिती  माधुरी देशमुख, माजी नगरसेविका  लता दलाल, नगरसेवक  कचरू घोडके,  दिलीप थोरात,   गोकुलसिंग मलके, माजी नगरसेवक  अनिल मकरिये,  बंडू ओक, सुरेंद्र कुलकर्णी,  आयुक्त डॉ निपुण विनायक,  शहर अभियंता  एस डी पानझडे, अभियंता  जे बी गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते  राम पेरकर,   मनोज घोडके,   उबाळे,  ज्ञानोबा मुंढे, शिल्पकार  मडीलगेकर, अधिकारी,  कर्मचारी , नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक   राम पेरकर यांनी केले .

आपल्या उदघाटन पर भाषणात  अतुल सावे यांनी सर्वाना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच  मुख्यमंत्री महोदयांनी शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे आभार मानले. मंत्री महोदयांनी यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला तसेच यावेळी त्यांच्या हस्ते शहरातील सी ए परीक्षेत मेरिट मिळविल्या बद्दल सुवर्णा काळे या विध्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला .

आपल्या उदघाटन पर भाषणात  चंद्रकांत खैरे यांनी इतर विद्यापीठांना महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे असे सुचवले. तसेच मा महापौर महोदयांनी यावेळी पुतळ्याचे श्रेय हे सर्वांचे आहे ,सर्व  माजी महापौर ,मा.सभागृह ,मा.आयुक्तमा जिल्हाधिकारी यांचे सहकार्य लाभले याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले,तसेच सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्यास  चंद्रकांत खैरे यांनी 80 लाख रुपये दिले याबद्दल त्यांनी त्यांचे यावेळी आभार मानले व या पुतळ्याचे उदघाटन लवकरच करण्यात येणार आहे असे यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी  संजीव सोनार यांनी केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!