Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी आणि मुलाचा मुळा धरणात बुडून मृत्यू

Spread the love

शिर्डीमध्ये मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळा धरणात बुडून माय लेकाचा मृत्यू झाला असल्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  कुटुंबासह फिरायला गेले असता अशी दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमध्ये पतीचा जीव वाचला आहे तर पत्नी आणि मुलाचा जीव गेल्याचं सांगण्यात येत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.


पुजा सातपुते ( वय 36 ) आणि मुलगा ओंकार सातपुते ( वय 13 ) अशी बुडून मृत्यू झालेल्या माय लेकरांची नावं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुार, ओंकारचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडिल पाण्यात गेले. पण त्यांनाही पोहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी आई पुजादेखील पाण्यात गेली. त्यांनी पतीला पाण्यातून बाहेर खेचलं पण यात मुलाला वाचवण्यासाठी त्या पुढे गेल्या आणि त्यात त्यांचाही त्यात मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मयत मायलेक नगरच्या बोरुडेमळा इथले रहिवासी आहेत. त्यांच्या अशा जाण्याने सातपुते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण गावात या प्रकारामुळे शोककळा पसरली आहे. या अपघाताची माहिती मिळताच इतर पर्यटकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!