Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच वंशज आता भारतीय जनता पार्टीसोबत : मुख्यमंत्री

Spread the love

उदयनराजे यांना भाजपमध्ये प्रवेशित करून  महाराष्ट्रात परत येताच आपल्या महाजानदेश यात्रेला पुन्हा प्रारंभ केला यावेळी उदयन राजे यांच्या प्रवेशाबद्दल ते म्हणाले कि, ‘मोगलांच्या तावडीतून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच वंशज आता भारतीय जनता पार्टीसोबत आले आहेत. पाकिस्तानच्या विरोधातील कारवाई असो की काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून देश एकसंघ करण्याचा निर्णय असो, ही भाजपची ध्येय धोरणे पटल्यानेच छत्रपतींचे संपूर्ण घराणे आता आमच्यासोबत आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजपच्या  महाजनादेश यात्रेचा पुढील प्रवास आज श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून सुरू झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री  पुढे म्हणाले, ‘दिल्लीत आज एक महत्त्वाचा कार्यक्रम करून येथे आलो आहे. आपण सर्वजण छपत्रती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेता. मोगलांच्या तावडीतून देश सोडवून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. खरे तर आपण पहातो की कार्यकाळ संपत आल्यावर लोक पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. मात्र, उदनराजे यांनी निवडून आल्यावर अवघ्या तीन महिन्यांत हे धाडस केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला मजबूत आणि विकसित बनविण्याचे जे काम सुरू आहे, ते पटल्यामुळे आणि त्याला पाठबळ देण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचे उदयनराजे सांगत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे आम्हाला काम करण्यास अधिक बळ मिळणार आहे. राज्यात छत्रपतींचे संपूर्ण घराणे आता भाजपसोबत आहे. शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे, घाटगे घराण्याचे समरजितराजे, छत्रपतींचे दुसरे वंशज शिवेंद्रराजे आणि आता उदयनराजे आमच्यासोबत आले आहेत. एकसंघ देशाची बांधणी करण्याचा विचार पटल्याने ही मंडळी आपल्यासोबत आली असून त्यामुळे आपल्याला बळ मिळणार आहे.’

विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘पूर्वी राज्यात मूठभर लोकांनी सत्ता गाजविली. सामान्य लोकांना सत्तेचा फायदा मिळू दिला नाही. त्यांच्या दुप्पट कामे आम्ही करीत आहोत. साकळाई योजनेच्या सर्वेक्षणासाठी अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्यांची कामे झाली आहेत. रस्ते आणि सिंचनाची उरलेली कामे लवकरच होणार आहेत.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!