Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन २८८ जागा लढवणार , पण किती जागा निवडून येतील ? याचे प्रकाश आंबेडकरांनी दिले ” हे ” उत्तर !!

Spread the love

राज्यात ‘वंचित बहुजन आघाडी स्वबळावर २८८ जागा लढवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे आमच्या २५० जागा येतील, असा दावा मी करणार नाही. कारण मला ईव्हीएमची भीती वाटते. ईव्हीएम हॅक होते, हे हॅकरने मला शपथपत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील मतदान आणि मतमोजणीनंतरचे मतदान याचा ताळमेळ निवडणूक आयोगानेच सिद्ध करावा’, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

जालना येथे अलुतेदार-बलुतेदार यांचा सत्ता संपादन मेळावा घेण्यात आला. त्यानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीची रणनीती स्पष्ट करताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली.  ‘एमआयएम’शी असलेली वंचित बहुजन आघाडीशी युती तुटली असल्याचे मान्य करून ते म्हणाले कि , स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ‘एमआयएम’ने युती तोडली. या निर्णयाविषयी कटुता नाही. काँग्रेसशी युतीबाबतची चर्चाही थांबवली आहे. वामनराव चटप यांची शेतकरी संघटना, लाल निशाण पक्ष, सीपीआय-सीपीएमचा एक गट व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाशी आमची युती होणार आहे. मुस्लिमांना पुरेसे प्रतिनिधीत्व दिले जाणार आहे. किती जागांवर विजयी होऊ ते सांगता येणार नाही. कारण ईव्हीएम हॅक होते हे एका हॅकरने मला शपथपत्रावर लिहून दिले आहे. तसेच कोर्टासमोर प्रात्यक्षिकाची तयारी दाखवली आहे. त्यामुळे निवडणुकीत मला फक्त ईव्हीएमची भीती वाटते’, असे आंबेडकर म्हणाले.

सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपा-सेनेत चालले आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस संपल्याची चर्चा सुरू आहे. नेते संपले, पण कार्यकर्ते संपले का असा माझा प्रतिप्रश्न आहे. विरोधी पक्ष जगला तर लोकांचे कल्याण होईल, असे आंबेडकर म्हणाले. सध्या देशात मंदी आहे. केंद्र सरकारच्या धोरणाचा पहिला फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. कापसाची आयात अमेरिकेतून सुरू आहे. त्यातून इथल्या कापसाला भाव मिळणार नाही. कापूस खरेदी १० ऑक्टोबरपूर्वी सुरू करावी. म्हणजे शेतकऱ्यांना कळेल की मतदान कुणाला करायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना दिलेल्या टाळीची किंमत कापूस उत्पादक शेतकरी चुकवत आहेत, अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली.

दरम्यान, ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मौलाना उस्मान रहेमान शेख, नायब अन्सारी यांच्याशी आंबेडकर यांनी चर्चा केली. त्यानुसार उलेमा बोर्डाने ‘वंचित’ला पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम उमेदवार निश्चित करताना उलेमा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जालना येथील सभेत…

हे सरकार झिंगलेल्या माणसासारखे चालतंय. हम करे सो कायदा आणि विरोधात बोललं तर देशद्रोही अशी लेबलं लावली जात आहेत. आरएसएस  आम्हाला देशभक्ती शिकवतेय हे दुर्भाग्य असल्याची टीकाही त्यांनी जालना येथे आयोजित बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात बोलताना केली.

केंद्र सरकार थेट हल्ला करताना आंबेडकर म्हणाले कि , हे ‘दारुड्यां’चं सरकार आहे. दारुडा जसे स्वतःचे पैसे संपल्यावर चोऱ्या करतो, घरातलं समान विकतो. तसच केंद्र सरकार आता  आरबीआय च्या पैशावर डल्ला मारला आहे . आतापर्यंत कोणीच असं केलं नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!