बहुचर्चित ‘तेरी मेरी कहानी’ राणू मंडलचं पहिलं गाणं ‘Tips’! वर प्रदर्शित !!

Spread the love

 

सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय झालेल्या स्टेशन सिंगर राणू मंडल यांना सोबत घेऊन गायक, संगीतकार हिमेश रेशमिया यांनी गायलेलं ” ‘तेरी मेरी कहानी ” या गाण्याच्या ऑफिशियल व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे . या गाण्याचं रेकॉर्डिंग नुकतचं मुंबईत पार पडलं होतं . या रेकॉर्डिंगचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या व्हीडीओत हिमेश रेणूकडून गाणं गाऊन घेताना दिसत आहे. राणूने ‘तेरी मेरी कहानी’ हे आपलं पहिलं वहिलं गाणं रेकॉर्ड केलं आहे.

Advertisements

राणूचे हे पहिलं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यावर सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झालं. ‘हॅपी हार्डी एण्ड हीर’ या चित्रपटातील हे गाणं आहे. राणूचं हे गाणं सध्या सोशलमिडीयावर ट्रेंडींग आहे. राणू मंडलच्या या गाण्याची खूप चर्चा झाली होती. त्यामुळे हे गाणं कधी एकदा प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. गाण्याच्या टीझरने आणि मेकिंग व्हीडीओने चाहत्यांची मनं जिंकली होती. आता हे गाणं काय धम्मल करणार हे बघावं लागेल. केवळ हे गाणं नाही तर राणू ने हिमेश बरोबर आणखी एक गाणं गायलं आहे. आदत आणि आशिकी मे तेरी ही गाणी गायली आहेत.

पश्चिम बंगाल येथील राणू मंडल  दररोज  स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होत्या . लता दीदींचं अवघड गाणं सहजतेने गाणाऱ्या राणूला पाहून एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या. आता तर राणूला मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी  निमंत्रित केलं जात असून एका कार्यक्रमाच्या टीमनं तर त्यांचा  मेकओव्हरच करीत त्यांचा लूक पुर्णपणे बदलला आहे.

Leave a Review or Comment

आपलं सरकार