“वाद दीराशी आहे तर मग नवरा कशाला सोडायचा?,” सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन हर्षवर्धन पाटील यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशाच्या वेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेऊन आपली तीव्र प्रतिक्रिया देताना  राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना, वाद दीराशी आहे तर मग नवरा कशाला सोडायचा? असा टोला लगावला आहे.

Advertisements

औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या कि, “हर्षवर्धन पाटील यांचं भाषण ऐकून आपण अनेक वेळा त्यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही,” अशी माहिती दिली. पुढे बोलताना त्यांनी आपली राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची कधीच भेट झाली नसल्याचं सांगितलं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये अलिबाबा आणि ४० चोर असं म्हटलं होतं. पण आता त्यातील अनेकजण त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार