Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : पोलिस आयुक्तालयातील गणपतीचे विसर्जन

Spread the love

औरंंंगाबाद  पोलिस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचाNयांनी बसविलेल्या गणपतीचे एक दिवस आधी बुधवारी (दि.११) विसर्जन करण्यात आले. पोलिस अधिकारी व कर्मचा-यांना गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी होता यावे यासाठी पोलिस आयुक्तालयातील गणपतीचे विसर्जनाच्या एक दिवस आधीच विसर्जन करण्यात येते.

बुधवारी सकाळी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते गणपतीची विधीवत पुजा करण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त मिना मकवाना, निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, हनुमंत भापकर, वाहतुक शाखेचे सहाय्यक आयुक्त कोल्हे आदींची उपस्थिती होती. पोलिस आयुक्तालयापासून गणपतीचे मिरवणूक काढण्यात येवून मिलकॉर्नर, खडकेश्वर, औरंगपुरा मार्गे औरंगपु-यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर असलेल्या विहिरीत गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, गेल्या दहा दिवसापासून आगमण झालेल्या बाप्पांना गुरुवारी (दि.१२) निरोप देण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता राजाबाजार परिसरातील श्री संस्थान गणपती मंदिर येथे आरती करुन विसर्जन मिरवणूकीस सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ.सतीश चव्हाण, मनपा आयुक्त निपून विनायक, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र जंजाळ आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!