Aurangabad : चोरीच्या मोटारसायकलवर प्रेयसीला फिरविणारा चोरटा अखेर गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – चोरीची मोटरसायकल आणि प्रेयसीसहित वेदांतनगर पोलिसांनी चोरटा रविवारी पहाटे अडीच वाजता पकडून एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या हवाली केला.
सूरज ज्ञानेश्वर म्हेसमाळे (२२) रा. दहिगाव मुरमे असे त्याचे नाव असून त्याने ही मोटरसायकल दोन महिन्यांपूर्वीजुलै महिन्यात वाळूज औद्योगिक परिसरातून चोरल्याची कबुली दिली.

Advertisements

दोन दिवसांपूर्वी पीएसआय भदरगे पहाटे अडीच वाजता गस्तीवरअसतांना आरोपी म्हैसमाळे मोटरसायकल आणि त्याच्या प्रेयसीसहित पकडला. त्यावेळी गाडीला नंबर दिसंत नव्हता. शेवटी पाठीमागे एक नंबर प्लैट मोटरसायकलला लटकंत असलेली दिसली. तिच्यावर नंबर होता पण तो क्रेटा गाडीचा निघाला.

Advertisements
Advertisements

शेवटी म्हैसमाळेला पोलिस ठाण्यात आणले पण म्हैसमाळेने प्रेयसी सोबंत आहे असे कारण सांगून व दुसर्‍या दिवशी हजर होण्याचे वचन देऊन  पोलिस ठाण्यातून तात्पूरता पंळ काढला पण दुसर्‍या दिवशीही म्हेसमाळे पोलिसठाण्यात यायचे नाव घेईना शेवटी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना सांगून चोरट्याला पोलिस ठाण्यात हजर केले. त्याने मोटरसायकल ही चोरीची नसल्याचे पोलिसांना सांगितले व ती एका गृहस्थाकडून आपण घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी म्हैसमाळेने सांगितलेला गृहस्थ पोलिस ठाण्यात चोरट्या समोर उभा केला. पण म्हैसमाळेलाच त्याला ओळखता आले नाही.कारण या पूर्वी आपण त्यागृहस्थाला कधी भेटलोच नाही अशी कबुली दिली.

शेवटी दोन फटके खाल्ल्यावर म्हैसमाळे सुतासारखा सरंळ झाला आणि पोपटासारखा बोलू लागला. यापूर्वी त्याने २३ जूलै रोजी वाळूज एम.आय.डी.सी.तून वरील मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा पोलिस तपासात समोर आला.ही सर्व कारवाई पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे तसेच पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.या कारवाईत पीएसआय राहूल भदरगे, पोलिस कर्मचारी हबीब शेख किशोर बनसोडे यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार