Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तपासात बदलले खुनाचे कारण, ‘त्या ‘ विवाहितेचा खून अनैतिक संबंधातून, नवर्‍यासह तिघे जेरबंद

Spread the love

औरंगाबाद – मुकुन्दवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या आरती गवळे खून  प्रकरणात  पोलिसांनी मयत विवाहितेच्या नवर्‍यासह तीन आरोपी मुकुंदवाडी पोलिसांनी बुधवारी जेरबंद केल्याची  माहिती पोलिस निरीक्षक उद्धव जाधव यांनी दिली. राहूल आणि आरतीच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती. पण त्यांना मुलबाळ होत नव्हते याचा गैरफायदा घेत मंगेश गवळे आणि मनोज थोरात हे आरतीच्या मागे लागले होते. याची माहिती आरतीच्या पतीला मिळाल्याने हा खून झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आणि या प्रकरणाला कलाटणी मिळाली.

पोलिसांनी सांगितले कि , या प्रकरणातील दोन आरोपी मंगेश गवळे आणि मनोज थोरात या दोघांचेही मयत आरतीशी अनैतिक संबंध होते असे पोलिस तपासात उघड झाले आहे. वरील दोन आरोपी पैकी मंगेश आणि आरतीचे व्हिडीओकाॅल आणि व्हाईस काॅल पती राहूल गवळे ने बघितले होते त्याचा जाब त्याने आरतीला विचारल्यावर मयत आरतीने अनैतिक संबंधाची कबुली राहूल गवळेकडे दिली होती.

दरम्यान राहूल गवळेच्या प्लाॅटवर आरतीची बहीण राहात होती  म्हणून उदभवलेल्या वादातून आरतीचा खून झाला अशी फिर्याद मयत आरतीचे वडिल बाबासाहेब म्हस्के यांनी दिली होती त्यानुसार मुकुंदवाडी पोलिस तपास करंत होते. परंतु  मयत आरतीचा मोबाईल पोलिसांनी चेक केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. गुन्ह्याचे चित्र स्पष्ट झाल्यावर पोलिस निरीक्षक उद्धव  जाधव यांनी मंगेश गवळे आणि मनोज थोरात ला मंगळवारी ताब्यात घेत कसून  चौकशी केली तर बुधवारी पहाटे दीड वाजता  राहूल गवळेला मुकुंदवाडी परिसरातूनच अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांनी दिली. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र बांगर, सहाय्यकफौजदार काकड, सुनिल पवार यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!