Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

८० हजारात दिली खुनाची सुपारी आणि पाच हजार रुपये अॅडव्हान्सही दिला !!

Spread the love

हि सत्य कथा आहे राजस्थानच्या भिलवड्यातील कर्जत बुडालेल्या एका सावकाराची !!  राजस्थानमधल्या एका खून प्रकरणाची ही धक्कादायक बातमी तुम्हालाच काय सर्वांनाच चकित करणारी करणारी आहे. बलबीर सिंग खारोल नावाच्या या ३८ वर्षांच्या एका माणसाचा खून झाला. हा माणूस लोकांना कर्ज द्यायचा पण या धंद्यात तोच कर्जबाजारी झाला. त्याच्या खुनानंतर पोलिसांनी त्याने केलेल्या फोन कॉल्सवरून त्याच्या मारेकऱ्यांना पकडलं. या प्रकरणी पोलिसांनी सुनील यादव आणि राजवीर नाईक या दोघांना अटक केली. पण आता चौकशीत जे आढळलं ते ऐकून पोलीसही थक्क झाले.

या दोघांना बलबीर सिंग खारोल यानेच त्याच्या खुनाची सुपारी दिली होती. या खारोलने २० लाख रुपये गोळा केले होते. हे पैसे त्याने लोकांना कर्ज म्हणून वाटले पण लोकांनी व्याज तर बुडवलंच. शिवाय कर्जाची रक्कमही बुडवली. यामुळे निराश झालेल्या बलबीर सिंग खारोलने स्वत:च्याच खुनाचा कट रचला.त्याने हे काम दोन मारेकऱ्यांवर सोपवलं. त्यासाठी एकूण ८० हजार रुपये द्यायचं कबूल केलं आणि ५ हजार रुपयांचा अॅडव्हान्सही दिला. खारोल या दोन खुन्यांसह अज्ञात ठिकाणी गेला. त्याने बाकीचे पैसे खिशात ठेवले होते.

आपला खून झाला की हे पैसे मारेकऱ्यांनी त्याच्या खिशातून घ्यावेत, अशा सूचनाही त्याने मारेकऱ्यांना दिल्या ! हे तिघंही जण जेव्हा मंगरोप भागात गेले तेव्हा यादवने खारोलने त्याचे हात पाय दोरीने बांधले आणि दुसऱ्या मारेकऱ्याने फास आवळला. या भागातलं CCTV फूटेज आणि खारोलने केलेले फोन कॉल्स याच्या मदतीने पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. बलबीर सिंग खारोल याच्या मागे त्याची पत्नी, मुलं आणि आईवडील असा परिवार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!