Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bad News : बाळाला दूध पाजताना आईला काळझोप लागली आणि तिच्या अंगाखाली गुदमरून झाला तीन महिन्याच्या बाळाचा मृत्यू !!

Spread the love

बाळाला दूध पाजताना त्याच्या आईला चुकून झोप लागली आणि जन्मभर वेदना देईल अशी घटना या मातेच्या आयुष्यात घडली. या महिलेच्याच अंगाखाली गुदमरून तिच्या तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना आग्रा येथील मालौनी गावात घडली आहे.

या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरिता सिंह असं या महिलेचं नाव आहे. कुशीवर झोपून सरिता आपल्या बाळाला दूध पाजत होती. यादरम्यान काही वेळासाठी तिचा डोळा लागला. या काही वेळात होत्याचं नव्हतं झालं होतं. झोपेतून जाग आली तेव्हा तीन महिन्यांचं आपलं बाळ स्वतःच्याच अंगाखाली दबलं गेल्याचं तिच्या लक्षात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

कारण आईच्या शरीराखाली दबल्यानं बाळ गुदमरलं होतं. बाळाच्या शरीराच्या काहीच हालचाल होत नसल्याचं कळल्यानंतर सरिता जोरजोरात ओक्साबोक्शी रडू लागली. तिचा आवाज ऐकून कुटुंबीयही घाबरले. काही महिन्यांपूर्वीच घरात आलेला नवा पाहुणा आता आपल्यात नाही, हे समजताच त्यांच्याही पायाखालची जमीन सरकरली. कारण गुदमरून बाळाचा जागीच मृत्यू झाला होता.यानंतर तातडीनं बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषिक केलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!