Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : अल्पवयीन विद्यार्थीच अपहरण करून सामूहिक लैंगिक अत्याचार, एकास अटक , दोन फरार

Spread the love

इयत्ता आठ‌वीच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर चार जणांनी गावाशेजारी असलेल्या स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही अघोरी घटना हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली असून, या परिसरात आरोपींविरुद्ध प्रचंड संपात व्यक्त केला जात आहे.

प्रकरणी पोलिसांनी सामुहिक बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुख्य म्हणजे या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. अमीत जयप्रकाश ठाकूर (१८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बलवंत गोंड (२३) व एक अल्पवयीन आरोपी फरार आहे.

पीडित मुलीचे आईवडील मजुरी करतात. तिला मोठा भाऊ असून आरोपी त्याचे मित्र आहेत. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास ती शौचाकरिता घरापासून काही अंतरावर गावाबाहेर गेली होती. तेथून ती परत येत असताना आरोपींनी तिला पकडले व दुचाकीवरून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला गावात आणून सोडले व कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी १ वाजता पुन्हा आरोपींनी तिच्याशी असाच प्रकार केला. संध्याकाळी आई कामावरुन परतल्यानंतर तिने हा प्रकार सांगितला.

हि माहिती मिळताच आईने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले. विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अमीतला अटक केली आहे. एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतर दोघेजण फरार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!