पती -पत्नीच्या भांडणात आईने दिला मुलीचा बळी

Advertisements
Advertisements
Spread the love

पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी घडला. नोकरीसाठी अमेरिकाला जाण्यावरून पती-पत्नीत वाद झाल्यानंतर मुलीसह घरातून निघून गेलेल्या महिलेने काकाच्या घरी जाऊन हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.

Advertisements

अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षराची आई श्वेता अमित पाटील (वय ३६, रा. अरविंद अपार्टमेंट, तावरे कॉलनी) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम येथे पाटील कुटुंबीय राहण्यास आहेत. श्वेता आणि अमित यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला आहे. त्यांना अक्षरा ही एकच मुलगी होती. अमित सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, ते हिंजवडी परिसरातील एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत, तर पत्नी श्वेता हिचे बीकॉमपर्यंत शिक्षण झाले असून, त्या गृहिणी आहेत. यापूर्वी एका नामांकित आयटी कंपनीत नोकरीस होती. अमित यांना कंपनीतर्फे पुढच्या महिन्यात अमेरिकेत जाण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे अमित पत्नी व मुलीला घेऊन अमेरिकाला स्थलांतरित होणार होते. श्वेता अमेरिकेत जाण्यास नकार देत होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते; परंतु अमितला अमेरिकेला जायचे होते. सोमवारी दुपारी दोन वाजता व्हिसा पंचिंगसाठी त्यांना चेन्नई येथे जायचे होते. त्यांना श्वेतालाही चेन्नईला सोबत घेऊन जायचे होते. त्यांनी विमानांची तिकिटे काढली होती; परंतु त्यांच्यात वाद झाल्यानंतर श्वेता अक्षराला घेऊन घरातून निघून गेली.

आपलं सरकार