‘किस ‘ दिला नाही म्हणून मैत्रिणीला ढकलून दिले आणि झाला मृत्यू , मित्राला ठोकल्या बेड्या

Spread the love

मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील बीजापुरी गावामध्ये पाच सप्टेंबरला किस दिला नाही म्हणून मित्रानेच तरुणीची हत्या केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे . पोलिसांनी शनिवारी आरोपीला बेडया घातल्या. गावच्या जंगलामध्ये मुलीचा मृतदेह सापडला. डोक्याच्या मागे जखमा होत्या तसेच तिची बॅगही घटनास्थळी सापडली. मृत मुलगी १२ व्या इयत्तेत शिकत होती.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी तिने घर सोडले होते. मृत मुलीचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर हिनौता गावात रहाणाऱ्या एका मुलाबरोबर तिची चांगली मैत्री असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृत मुलीबरोबर आपली खूप चांगली मैत्री होती. शाळेतून सुटल्यानंतर आम्ही बीजापुरी गावातील जंगलात फिरण्यासाठी म्हणून गेलो होतो.

तिथे कालव्याजवळ असणाऱ्या एक दगडावर बसलो होतो असे त्याने पोलिसांना सांगितले. दोघांचे बोलणे सुरु असताना आरोपीने तिला किस करण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने त्याला दूर लोटले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने मुलीला ढकलून दिले. ती दगडावर जाऊन आदळली व तिथेच निपचित पडली. मुलगी काहीच हालचाल करत नसल्याचे पाहून तो घाबरला. त्याने तिथे असलेल्या झाडाच्या फांद्यानी मुलीचा मृतदेह झाकून ठेवला व घरी पळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Leave a Review or Comment

आपलं सरकार