Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : विभागीय क्रिडा संकुलात सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

Spread the love

विभागीय क्रिडा संकुलातील सुरक्षारक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास समोर आली. करण बहादुर टिकाराम ठाकुर (४०, रा. एन-६, संभाजी कॉलनी, सिडको) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. दरम्यान, त्याने लिहीलेली सुसाईड नोट जवाहरनगर पोलिसांनी हस्तगत केली आहे. तो काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या खचलेला होता. अशी माहितीही त्याच्या नातेवाईकांनी दिली.
मेडिएटर्स सेक्युरिटी कंपनीच्या वतीने विभागीय क्रिडा संकुलात करण बहादुर ठाकुर सुरक्षारक्षकाचे काम करत होता. गेल्या चार वर्षांपुर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे. तेव्हापासून करण बहादुर नैराश्यात होता. अशात तो मानसिकदृष्ट्या खचलेला होता. सोमवारी रात्री कामावर असताना त्याने क्रिडा संकुलातील टेनिस स्पोर्टसच्या जिन्यातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार आज सकाळी निदर्शनास आल्यावर जवाहरनगर पोलिसांसह मेडिएटर्सच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. त्याला बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास जमादार एम. डी. कायटे करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!