Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर ‘एमआयएम’ने जाहीर केली पहिली यादी !!

Spread the love

जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेतल्यानंतर एमआयएम ने (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) विधानसभा निवडणुकीसाठीची तीन उमेदवारांची पहिली यादी घोषित करून सर्वांनाच धक्का दिला आहे. विशेष म्हणजे आजच पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांची पाठराखण करीत वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत असल्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांनी सर्व पक्षांना धक्का देत विधानसभेच्या तीन जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले.

एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव या तीन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे यांना, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्य मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात एमआयएमने बाजी मारली आहे.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलिल यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत  एमआयएमने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत ७४ जागांवर लक्ष केंद्रीत करून ,  उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आली असल्याची माहिती  दिली होती. यामध्ये  मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्याची माहिती जलिल यांनी दिली. टप्प्याटप्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता कोणासोबत युती नसल्यामुळे किती जागांवर उमेदवार लढवायचे यावर बंधन नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या एमआयएम ७४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. एमआयएम सोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज असल्याचा दावा त्यांनी केला. दलित समाज किंवा अन्य कोणत्या समाजावर एका पक्षाचे वर्चस्व आहे. हे कोणी समजू नये असेही जलिल यांनी म्हटले. वंचित बहुजन आघाडी सोबत एमआयएमची आघाडी झालेली नसल्याने अनेक पक्षातील नेत्यांनी एमआयएमशी उमेदवारीशी संपर्क करीत असल्याची माहितीही  खासदार जलील यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!