Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पालावर राहणारी ११ मुलांची अनोखी माता , २० व्यावेळी आहे गर्भवती , सर्व रिपोर्ट्स आहेत नॉर्मल

Spread the love

आपल्या अवती भवती कुठे काय घडेल याचा नेम नाही. अशीच एक अनोखी घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. माजलगाव शहराजवळ पालावर राहणारी एक महिला एक दोन नव्हे तर विसाव्यावेळी गर्भवती आहे. आरोग्य विभागाच्या तपासणीमध्ये हे पुढे आले. त्यानंतर माजलगावच्या वैद्यकीय अधीक्षकांसह पथकाने तिची व कुटुंबियाची पालावर जाऊन भेट घेतली. जिल्हा रुग्णालयात सोमवारी या महिलेची तपासणी करून घरी पाठविण्यात आले. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी प्रेस ट्रस्टशी बोलताना हि माहिती दिली.

माजलगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर केसापुरी वसाहत आहे. या परिसरात माऊली उर्फ राजाभाऊ देवीदास खरात हे पाल ठोकून वास्तव्य करीत आहेत. त्यांची पत्नी लंकाबाई खरात यांचे वय चाळीसच्या जवळपास आहे. त्या सध्या सतराव्या वेळी गर्भवती आहेत. लंकाबाई यांना नऊ मुली व दोन मुले असे अकरा अपत्य सध्या जीवंत आहेत. त्यासोबतच त्यांचे पाच अपत्य बाळंतपण झाल्यानंतर दगावल्याचे समजते. गोपाळ समाजाचे हे कुटुंब आहे.

लंकाबाई विसाव्यावेळी गर्भवती असल्याची माहिती आरोग्य विभागास समजली. त्यानंतर रविवारी सकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल परदेशी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन रुद्रवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रियांका राजेभोसले, सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर, परिचारिका, कर्मचाऱ्यांसह पथकाने लंकाबाई वास्तव्यास असलेल्या पालावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याकडे सोनोग्राफी करण्यात आली. त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेभोसले यांनी रक्ताची तपसणी, सोनोग्राफी अहवालाची तपासणी केली. लंकाबाई या जोखमीची माता असल्याने त्यांची सोमवारी जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. अठ्ठावीस आठवड्याची गर्भवती असून सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्यानंतर समुपदेश करण्यात आले असून यापूर्वीचे सर्व बाळंतपण घरी झाले असले तरी यावेळी जोखीम असल्याने सरकारी रुग्णालयात बाळंतपण करावे, असा सल्ला कुटुंबियास देण्यात आला. काही त्रास जाणवल्यास रुग्णालय जवळ करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!