Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदी यांनी मुंबईत जाहीर केल्याप्रमाणे उद्धव ठाकरे झाले लहान भाऊ !!

Spread the love

राज्यात शिवसेना भाजप यांची युती होईल कि नाही याच्या कितीही चर्चा रंगात असल्या तरी मुंबईच्या नुकत्याच झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ” लहान भाऊ ” असा केल्याने आता शिवसेनेला विधानसभेतही लहान भावाचीच भूमिका वाढवावी लागेल अशी शक्यता आहे. गेल्या  विधानसभा निवडणुकीत या युतीला धक्का बसला होता. मात्र निवडणूक निकालानंतरच्या स्थितीनं या पक्षांना पुन्हा एकत्र आणलं. त्यानंतर यंदाची लोकसभा निवडणूक भाजप-शिवसेनेनं एकत्र लढवली. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला देशासह राज्यात मोठं यश मिळालं. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजप नेतृत्वाने महाराष्ट्रात युती करताना तडजोड न करण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे शिवसेनेला लहान भावाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये भाजपला १५४ ते १५९ जागा मिळतील तर दोन्ही पक्ष महायुतीतील मित्रपक्षांना प्रत्येकी ९ जागा सोडतील, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेला १२० जागाच मिळणार आहेत.  हा फॉर्म्युला शिवसेना नेतृत्वाकडून मान्य केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत. तसंच मतदारसंघातील समीकरणं लक्षात घेत युती आणि आघाडीचा फॉर्म्युला तयार करण्यावरही भर देण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!