“या” ज्येष्ठ भाजप नेत्यावर झाला लैंगिक शोषणाचा आरोप, पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांनीच आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका विद्यार्थीनीने केला आहे. वर्षभरापासून माझं लैंगिक शोषण सुरू असून याप्रकरणी पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करत नसल्याचा संतापही तिनं व्यक्त केला आहे. त्यामुळे स्वामी चिन्मयानंद यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisements

दरम्यान, आपल्यावर बलात्कार झाल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. त्याची  व्हिडिओ क्लिपही आपल्याकडे असल्याचा दावा तिने केला. तर ५ कोटी रुपयांसाठी मी हा बनाव रचल्याचा चिन्मयानंद यांच्या वकिलाने केलेला आरोप खोटा असल्याचंही तिनं सांगितलं.

Advertisements
Advertisements

पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनीने आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. स्वामी चिन्मयानंद यांनी माझ्यावर बलात्कार केला असून गेल्या वर्षभरापासून माझे लैंगिक शोषण केले आहे, असा आरोपही या विद्यार्थीनीने यावेळी केला. प्रसारमाध्यमांना या घटनेची माहिती देताना तिने आपला चेहरा काळ्या स्कार्फने झाकला होता.

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी लोधी रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून ती शहाजहानपूर पोलिसांकडे वर्ग केली आहे. पण त्यात बलात्काराचा उल्लेखही करण्यात आला नसल्याचे सदर विद्यार्थीनीने सांगितले. रविवारी एसआयटी पथकाने ११ तास माझी चौकशी केली. मी त्यांना माझ्यावर बलात्कार झाला असल्याची माहिती दिली. एसआयटीला घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतरही अजूनही चिन्मयानंद यांना अटक झाली नसल्याचं तिनं निदर्शनास आणून दिलं.

 

आपलं सरकार