काँग्रेस नेते कमलनाथ यांची शीख विरोधी दंगलीची फाईल उघडण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची मंजुरी

Spread the love

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक बडे नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे. १९८४ मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीची फाइल पुन्हा उघडण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. ही केस पुन्हा उघड झाल्यास कमलनाथ यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisements

केंद्रीय गृहमंत्रालयाने कमलनाथ यांच्याविरोधात १९८४च्या शीख विरोधी दंगलीची फाइल पुन्हा उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिरोमणी अकाली दलाचे दिल्लीचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी आज ही माहिती दिली.

Leave a Review or Comment

आपलं सरकार