Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एमआयएम- वंचित बहुजन आघाडीच्या वादावर बोलले प्रकाश आंबेडकर

Spread the love

‘आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे,’ असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे.


विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली. त्यावर आता प्रकाश आंबडेकरांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असल्याचे वृत्त आयबीएन लोकमतने दिले आहे .

‘आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैद्राबादवरून  आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जो पर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तो पर्यंत आमची युती कायम आहे,’ असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एमआयएम बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे एमआयएम  ने हा निर्णय घेतला आहे.

जागावाटपाबद्दल एमआयएम चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता एमआयएम बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. एमआयएम ने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. एमआयएम ला ९८ जागांवर निवडणूक लढवायची होती पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांच्या या पक्षाने वंचित बहुजन आघाडीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

सरकारची अवस्था दारुड्यासारखी

सरकारने राज्यातील २५ गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेने राज्यभरात मोठा गदारोळ झाला. विरोधकांसह सोशल मीडियावरही लोकांनी सरकारवर जोरदार टीका केली. वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली आहे.

‘या सरकारची संपूर्ण तिजोरी खाली झाली आहे. एखाद्या दारुड्याप्रमाणे यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी गडकिल्ले विकायला काढले आहेत,’ अशी खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!