Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१९ : मेघना पेठे, मलिका अमर शेख, शीतल साठे, मंगेश बनसोड यांना जाहीर

Spread the love

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१९चा दया पवार स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार मेघना पेठे, ज्येष्ठ कवयित्री-लेखिका मलिका अमर शेख आणि नव्या पिढीच्या आघाडीच्या लोकशाहीर शीतल साठे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. यंदाचा हा तेविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गतवर्षी ‘बलुतं’च्या चाळीशीच्या निमित्ताने ग्रंथाली पुरस्कृत बलुतं पुरस्कार सुरू करण्यात आला होता. यावर्षी तो रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ख्यातनाम ‘जूठन’ या आत्मकथनाचा मंगेश बनसोड यांनी मराठी अनुवाद केला आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि वरिष्ठ पत्रकार-कथाकार प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करणार असल्याची माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली आहे.

आतापर्यंत या पुरस्काराने प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, प्रकाश खांडगे, हिरा बनसोडे, गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, रझिया पटेल, जयंत पवार, वामन केंद्रे, लक्ष्मण गायकवाड आदी मान्यवरांना गौरविण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!