Aurangabad Crime : मेव्हणीला स्वत:ची जागा दिल्यामुळे संतप्त पतीकडून पत्नीचा खून

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – मुकुंदवाडी रामनगर परिसरात आज संध्याकाळी ८ च्या सुमारास मेव्हणीला स्वता:चा मोकळा प्लाॅट राहण्यास दिला म्हणून बायकोचा गळा आवळून मृतदेह पलंगाखाली ढकलून आरोपी नवरा फरार झाला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

आरती राहूल गवळे असे मयत विवाहितेचे नाव असून तिचा नवरा राहूल गवळे याने आरतीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे. आसोपी राहूल गवळे हा मुंबईला खाजगी नौकरी करायचा एक महिन्यापूर्वी त्याचे सासरे बाबासाहेब मोहन म्हस्के यांनी राहूल ला औरंगाबादेत आणले. तेंव्हापासून राहूल आणि आरती किरायाच्या घरात राहात होते. पण रामनगर परिसरात राहूल चा प्लाॅट असून त्यावर त्याची मेव्हणी राहात होती.

Advertisements
Advertisements

आपल्या मालकीचा प्लाॅट असतांना आपण किरायाच्या घरात राहतो. यामुळे राहूल आणि आरतीचे वारंवार खटके उडंत होते.त्यातंच रविवारी संध्याकाळी राहूल आणि आरतीचे कडाक्याचे भांडण झाले.संतायपाच्या भरात राहूल ने आरतीचा गळादाबून खून केला व घराला कुलुप लावून पसार झाला होता. हा प्रकार मुकुंदवाडी पोलिसांना कळल्यानंतर पोलिस निरीक्षक उध्दव जाधव तसैच एपीआय चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. आरतीचे वडील बाबासाहेब म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे,घराचा दरवाजा तोडून आरती चा मृतदेह ताब्यात घेतला.पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी करंत आहेत.

आपलं सरकार