डॉक्टरला घातला चौघांनी १३ लाख ९० हजारांचा गंडा, एका परदेशी डॉक्टरसह चौघाविरुध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : इंग्लंडमधील  नामांकीत कंपनीचे  आयुर्वेदीक औषधी आणि सौदर्य प्रसादने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून ४ जणांनी शहरातील डॉक्टरला १३ लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातला. डॉक्टरला गंडा घालणा-या आरोपीमध्ये इंग्लडमधील ३ जणांसह मुंबईतील एका एजन्सी चालकाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर इंग्लडमधील एका डॉक्टरचाही आरोपीत समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लडमधील डिलर नॅन्सी डॅनियल, डॉ. मार्टिन फोर्ड, अँडी प्रिकमॅन, सर्व रा.इंग्लड,मुंबईतील बांद्रा परिसरातील पुजा बालाजी डिलर असे डॉक्टरला गंडा घालणा-या आरोपींची नावे आहेत. डॉ. शेख अख्तर यांचा मध्यवर्ती बसस्थानका समोर नवजीवन आयुर्वेदीक डिस्पेंन्सरी नावाने दवाखाना आहे. फेसबुक  आणि व्हॉट्सअप द्वारे काही महिन्यापूर्वी डॉ.शेख अख्तर यांची ओळख नॅन्सी डॅनियल यांच्यासोबत झाली होती. त्यावेळी नॅन्सी डॅनियल यांनी इंग्लडमधील नामांकीत कंपनीचे  आयुर्वेदीक औषधी व सौदर्य प्रसादने स्वस्तात देण्याचे आमिष डॉ. शेख अख्तर यांना दाखविले होते.
दरम्यान, डॉ. शेख अख्तर यांनी वेळोवेळी करुन नॅन्सी डॅनियल, डॉ. मार्टिन फोर्ड, अँडी प्रिकमॅन, सर्व रा.इंग्लड,मुंबईतील बांद्रा परिसरातील पुजा बालाजी डिलर यांच्या बँक खात्यात १३ लाख ९० हजार रुपये भरले होते. परंतु नंतर आयुर्वेदीक औषधी व सौदर्य प्रसादने न मिळाल्याने डॉ. शेख अख्तर यांनी संपर्क  साधला असता चौघांनीही उडवा-उडवीची उत्तरे देत होते. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

आपलं सरकार