Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिली डेडलाईन , पहिली यादी जाहीर होण्याच्या आत , काय ते लवकर सांगा…

Spread the love

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-सेना महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.  दरम्यान वंचित बहुजन आघाडी ने काँग्रेस युती करताना १४४  जागांची अपेक्षा ठेवली आहे मात्र  काँग्रेस कडून याबाबत अद्याप कुठलेही उत्तर आले नसल्याने वंचित बहुजन आघाडी ची पहिली यादी जाहीर होईपर्यंत काँग्रेससाठी दारे उघडी राहतील आणि नंतर बंद होतील असे वक्तव्य बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी केले आहे.

वंचित बहुजन आघाडी कडून जागावाटपात योग्य तो सन्मान राखला नसल्याचे कारण देऊन एमआयएमने  स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे . यावर मात्र त्यांनी अद्याप कुठलेही भाष्य केले नाही , मात्र वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्या युती संदर्भात वंचित बहुजन आघाडी ने १४४ जागांची ऑफर दिली आहे त्यावर ते ठाम आहेत.

वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला शेवटची डेडलाईन देण्यात आली असून वंचित बहुजन आघाडी ची पहिली यादी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत काँग्रेससाठी १४४ जागांचा प्रस्ताव कायम राहणार आहे असे पाटील यांनी म्हटले आहे वंचित बहुजन आघाडी ची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर मात्र काँग्रेसबरोबर युती होण्याचा विषय बंद होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावावर काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय आहे याविषयी अद्याप काँग्रेसकडून उत्तर आलेले नाही.

लक्ष्मण माने यांचीही प्रकाश आंबेडकरांवर टीका

वंचित बहुजन आघाडीचे फारकत घेऊन स्वबळावर निवडणुका लढण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर वंचित आघाडीचे पूर्वाश्रमीचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून लोक प्रकाश आंबेडकरांकडे सद्भावनेने पाहतात परंतु ते लोकांची सद्भावना समजून घेत नाहीत.  लोकशाहीत संघटनांचे काम माणसं जोडून संघटन मजबूत करण्याचे असते . माणसं सोडून राजकारण करता येत नाही , मात्र प्रकाश आंबेडकर यांच्याकडून माणसे तोडली जातात ते सहकाऱ्यांसोबत विश्वासाने राहत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत मीच काय एकही स्वाभिमानी मनुष्य राहणार नाही .

रामदास आठवले यांच्या कडून एमआयएमच्या भूमिकेचे स्वागत

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर , मुस्लिम आणि दलित मतांना सोबत घेऊन राजकारणात नवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असताना  एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निर्णयाचे आरपीआय नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

यावर आपली प्रतिक्रिया देताना आठवले यांनी म्हटले आहे की , लोकसभा निवडणुकीत एमआयएमला वंचित सोबत जाऊन कुठलाही फायदा झाला नाही . उलट एमआयएममुळे वंचित आघाडीलाच फायदा झाला यापुढेही वंचित आघाडी म्हणून लोक बाहेर पडतील आणि बाहेर पडलेले लोक रिपब्लिकन पक्षात प्रवेश करतील असा दावाही आठवले यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचितचा  विरोधी पक्षनेता असेल असा मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता.  त्यावर बोलताना आठवले म्हणाले की विरोधी पक्षनेता होण्याइतपत वंचित आघाडीला मते मिळणार नाहीत. लोकसभेत त्यांना मते मिळाली असली तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना फारसा लाभ होणार नाही असेही आठवले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!