Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Chandryan 2 Live : भारतासह संपूर्ण जग वैज्ञानिकांचा आविष्कार पाहण्यासाठी उत्सुक , विक्रमशी तुटलेला संपर्क स्थापित करण्याचे प्रयत्न सुरू

Spread the love

https://youtu.be/-FC7cacIxOU

श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून दीड महिन्यापूर्वी  २२ जुलै रोजी  झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पडून  अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर असलेले महत्वाकांशी चांद्रयान-२ शनिवारी पहाटे १.३० ते २.३० वाजेच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचण्यास सज्ज झाले आहे. या दुर्मिळ क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भारतीयांसह अवघ्या विश्वाचे लक्ष लागले आहे.


विक्रमशी  तुटलेला संपर्क स्थापित करण्याचे प्रयत्न सुरू

विद्यार्थी , शास्त्रज्ञांशी संवाद साधून सर्वांना शुभेच्छा देऊन मोदींनी घेतला निरोप .

मोदींचा फोटो सेशनसह विद्यार्थ्यांशी संवाद .

गेल्या तीन वर्षे शास्त्रज्ञांनी चांद्रयानवर खडतर मेहनत घेतली. मी आपल्या सोबत आहे . हिम्मतीने पुढे चला.

पंतप्रधान मोदी यांनी वाढवला शास्त्रज्ञांचा विश्वास . चढ -उतार येत असतात . तुमच्या कर्तव्यावर देशाला गर्व आहे : मोदी

विक्रमशी संपर्क तुटला .

इस्त्रोच्या कंट्रोल रूमध्ये मोठा तणाव आणि तेवढीच उत्सुकता आहे.

चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडर अवघ्या २५ किलोमीटरवर. अवघ्या काही मिनिटांमध्ये विक्रमचा कॅमेरा लँडिगसाठी जागा शोधणार.

रात्री १.५३ मिनिटांनी विक्रम चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार

चंद्राच्या पृष्ठभागापासून विक्रम लँडर अवघ्या २५ किलोमीटरवर

चांद्रयान – २ मोहिमेच्या खास क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूत दाखल

चंद्राच्या ज्या कक्षेत आजवर कोणी गेलं नाही, त्या ठिकाणी आपलं चांद्रयान जाणार आहे. आमचा सॉफ्ट लँडिंगवर पूर्ण विश्वास असून आज रात्रीची आम्ही वाट पाहत आहोत: इस्त्रोचे चेअरमन सिवन

चांद्रयान-२ चंद्रावर उतरण्यासाठी आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. या क्षणाची १३० कोटी भारतीय उत्सुकतेने वाट पाहत आहेत. भारतच नव्हे तर संपूर्ण जग वैज्ञानिकांचा हा आविष्कार पाहण्यासाठी उत्सुक आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या इतिहासातील क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मी बेंगळुरूच्या इस्रोच्या केंद्रात आल्याने माझा उत्साह आणखा वाढला आहे. हा क्षण पाहण्यासाठी विविध राज्यातील तरुणही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच या ठिकाणी भूटानमधील काही तरुणही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी ट्विट करुन दिली आहे. मोदींसोबत या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शालेय विद्यार्थीही उपस्थित राहणार आहेत.

इस्रोच्या ऑनलाइन प्रश्नमंजुषेत निवडले गेलेले काही विद्यार्थी माझ्यासोबत असणार आहेत. या प्रश्नमंजुषेत मोठया प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना अंतराळाविषयी असलेली आवड यातून अधोरेखित होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

चांद्रयान २ मोहिमेच्या सुरुवातीपासूनच मी यावर लक्ष ठेवून आहे. २२ जुलै २०१९ रोजी मोहीम सुरू झाल्यापासून मी याबाबतची माहिती नेहमी घेत आहे. भारतीयांची प्रतिभा आणि त्यांचा दृढनिश्चय या मोहिमेतून अधोरेखित होतो. ही मोहीम यशस्वी झाल्यास या यशाचा कोट्यावधी भारतीयांना फायदा होणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!