Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस- राष्ट्रवादीचा फॉर्म्युला तयार , राष्ट्रवादीच्या ७ नेत्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

Spread the love

काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते पक्षांतर्गत पडझडीने त्रस्त असले  तरी विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती आणि  उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाली. कोणत्या मतदारसंघात आपली शक्तीस्थानं काय आहेत आणि काय नकारात्मक बाजू आहेत, याबाबतही चर्चा करण्यात आली  आणि विधानसभेतील उमेदवारीसाठी पक्षातील काही दिग्गज नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या सात जणांच्या यादीत छगन भुजबळ यांचे नाव आल्याने आता त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला विराम मिळाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून पुन्हा एकदा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नवाब मलिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस १३८, राष्ट्रवादी १३८, आणि १२ जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. याशिवाय मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!