Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महायुतीची पहिली चर्चा फिस्कटली , ९ सप्टेंबर रोजी होईल दुसरी बैठक

Spread the love

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप युती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डा यांच्यात युती जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्यामुळे कोणत्या आणि किती जागांवर युतीमधील कोणाचा उमेदवार लढणार हा मुद्दा प्रथम मांडला गेला. परंतु जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याबाबत आता अधिक चर्चा केली जाणार आहे.

याबाबत शिवसेना-भाजप पक्षाच्या जेष्ठ नेत्यांमध्ये होणार आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची बैठक पार पडणार आहे. आगामी विधानसभेसाठी मजहाराष्ट्रातून २८८  जागांपैकी भाजप-शिवसेना मध्ये २७० जागा आणि घटक पक्षासाठी १८ जागा लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपला १६०, शिवसेना ११० आणि घटक पक्ष १८  जागांवर लढतील असा अंदाज पार पडलेल्या चर्चेतून समोर आला आहे.खा. संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या भेटीदरम्यानच्या एका घटनेची आठवण करून देत, युतीमध्ये दोन्ही पक्ष समान जागा लढवतील असे ठरले असल्याचे सांगितले आहे. असो आता पुन्हा एकद दोन्ही पक्षांमध्ये बैठका होऊन युतीचा नवा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे

दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षांदरम्यान जागावाटपाची पहिली फेरी पार पडली असून त्यात इतर घटक पक्षांना १८ जागा देण्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाली असल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. या दोन्ही पक्षांमध्ये २७० जागांपैकी किती जागा वाटून घ्यायच्या आहेत यावर चर्चा होणार आहे. भाजपला  १६० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत पण शिवसेना मात्र १६० जागांपेक्षा जास्त जागा भाजपला देण्यासाठी तयार नाहीये. तर स्वत:साठी शिवसेनेला ११० पेक्षा कमी जागा अमान्य आहेत. कालच्या या बैठकीत भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तर शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांनी चर्चा केली.

काँग्रेसची पहिली यादी

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या छाननी समितीची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जवळपास ६६ नावांवर  अंतिम निर्णय घेण्यात आला. येत्या १० सप्टेंबरला या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे.

काँग्रेस १३८, राष्ट्रवादी १३८, आणि १२ जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा. मित्र पक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे. १० सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची चर्चा देखील पूर्ण होणार असून त्याच दिवशी छाननी समितीची पुन्हा बैठक होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!