Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रिझर्व्ह बँकेच्या तंबीमुळे होमलोनपासून ते पर्सनल लोणचे व्याज दार कमी होण्याचे संकेत

Spread the love

होम लोन आणि सर्व प्रकारच्या कर्जधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना येत्या १ ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची कर्ज रेपोरेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे होमलोनपासून ते पर्सनल लोनपर्यंतच व्याज दर रेपोरेटशी आधारित राहणार आहे, त्यामुळे कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. परिणामी गृहकर्जापासून ते पर्सनल लोन पर्यंतची कर्जाचा व्याजदर कमी होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने यापूर्वी बँकांना गृहकर्ज, ऑटो लोन, पर्सनल लोन आणि एमएसएमई सेक्टरचे सर्व प्रकारचे कर्ज रेपोरेटशी संलग्न करण्याचे आदेश दिले होते. मात्र बँकांनी त्याकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे आरबीआयने आता या बँकांना थेट १ ऑक्टोबरची डेडलाइनच दिल्याने बँकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. रेपोरेट सारख्या बाहेरच्या बेंचमार्कनुसार तीन महिन्यातून किमान एकदा व्याज दरात बदल करण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले आहेत.

आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतरही बँकांकडून व्याज दरात कपात केली जात नसल्याच्या तक्रारी ग्राहकांनी आरबीआयला केल्या होत्या, त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयने या वर्षी चार वेळा रेपो रेटमध्ये १. १० टक्के कपात केली आहे. तर केंद्रीय बँकांनी केवळ ०. ८५ टक्केच कपात केली आहे.

रेपो रेटशी व्याजदर संलग्न केल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. आरबीआय जेव्हा जेव्हा रेपो रेट कमी करेल तेव्हा तेव्हा बँकांना व्याजदर कमी करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कर्जांवरिल व्याजदर आपोआप कमी होणार असल्याने त्यांना कर्जाचा हप्ता कमी बसणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!