Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे अर्थी विश्लेषण केंद्र सरकारला अमान्य

Spread the love

देशाची आर्थिक स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेलं विश्लेषण अमान्य असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. मात्र आता देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेनं आगेकूच करत असून देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे.

देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक असून त्याला जीएसटी आणि नोटाबंदी सारखे निर्णय जबाबदार असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. त्यावर भाजपनं सिंग यांना उत्तर दिलं होतं. मात्र आज केंद्र सरकारकडूनही अधिकृत उत्तर देऊन मनमोहन सिंग यांचे मुद्दे खोडून काढण्यात आले. आम्ही मनमोहन सिंग यांचं आर्थिक विश्लेषण मान्य करत नाही. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. आता ती ५ व्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने देशाची आगेकूच सुरू आहे, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.

जीएसटी परिषदेची प्रत्येक महिन्याला बैठक होते. त्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. जनतेचंही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पुन्हा वेग घेईल आणि अर्थव्यवस्थेची चांगली कामगिरी लवकरच पाह्यला मिळेल, असंही जावडेकर यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!