Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंदू -मुस्लिम सलोख्यासाठी मोहन भागवत आणि मौलाना सय्यदअर्शद मांडणी यांची चर्चा

Spread the love

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे नेता मौलाना सय्यद अर्शद मदनी यांची भेट झाली. सांगण्यात येत आहे कि , दोन्ही नेत्यांनी देशाची राजकीय परिस्थिती आणि सामाजिक सलोख्यासाठी सहकार्यावर चर्चा केली. बैठकीत सरसंघचालकांनी मदनी यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे  दिली. हिंदुत्व कसे  सामाजिक सलोखा राखते हे सांगण्यावर त्यांचा रोख होता.

दिल्लीतील संघ मुख्यालयात केशव कुंज येथे ही बैठक झाली. भाजपचे माजी संघटन महामंत्री रामलाल देखील उपस्थित होते. ही बैठक सुमारे दीड तास चालली. मदनी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं, ‘आम्ही सार्वजनिक व्यासपीठावर सामाजिक सलोख्याच्या संदेशासाठी एकत्र दिसू शकतो. पण जोपर्यंत यासाठी निश्चित काही ठरत नाही, तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही.’

आरएसएसच्या सूत्रांनी सांगितलं की मदनी यांना खूप दिवसांपूर्वीच आमंत्रण दिलं होतं. त्यांना विज्ञान भवनातील संघाच्या कार्यक्रमालाही बोलावलं होतं. पण मदनी गोरक्षकांच्या कथित हिंसेचा निषेध म्हणून दूर राहिले. संघही कुठल्याच प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही आणि अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आम्ही हे जाहीरपणे सांगितलं आहे, असं भागवत यांच्या प्रतिनिधींनी मदनी यांना सांगितलं.

आरएसएसच्या सूत्रांनी सांगितलं की, ‘आम्ही नियमितपणे अशा चर्चा करत राहणार आहोत. आरएसएस नेहमी विविध समुदायांच्या नेत्यांना भेटत असते. हिंदू-मुस्लिम एकतेच्या दृष्टीकोनातून ही बैठक महत्त्वाची होती.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!