Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची आज होईल भारतीय अधिकाऱ्यांची भेट

Spread the love

कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज, सोमवारी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना भेटू देण्यात येणार असल्याचे पाकिस्तानने रविवारी सांगितले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी ही माहिती दिली. व्हिएन्ना करारानुसार आणि पाकिस्तानी कायद्यानुसार कुलभूषण जाधव यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटू दिले जाणार आहे.

याआधीही पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र ही भेट थेट नव्हती. यात अडथळे होते. त्यामुळे भारताने अशा स्वरूपाची भेट नाकारली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) मिळवून द्यावी, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. जाधव यांना दूतावासाची मदत देण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट होईल त्याठिकाणी पाकचा एक अधिकारी उपस्थित राहील, भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि भारतीय अधिकारी आणि जाधव यांच्यात होणारी चर्चा रेकॉर्ड केली जाईल, अशा अटी ठेवल्या होत्या. भारताने त्या मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना कथित हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितल्यानंतर या शिक्षेला स्थगिती मि‌ळाली होती. ‘जाधव यांच्या खटल्याचा आणि शिक्षेचा आढावा घेऊन या प्रकरणी फेरविचार करावा आणि त्यांना विनाविलंब भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी,’ असे आदेश न्यायालयाने पाकिस्तानला १७ जुलै रोजी दिले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!