Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्विस बँकेत किती भारतीयांचा किती काळापैसा आहे ? यादी हातात येण्याची शक्यता

Spread the love

देशातील काळ्यापैशाला लगाम घालण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदी आणि बेहिशोबी मालमत्तेबाबतचे अनेक निर्णय घेतले. मात्र त्याने काहीच फरक पडला नसला तरी भारतासाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. स्विस बँकेत किती भारतीयांचा किती काळापैसा आहे, याची माहिती उद्या मिळण्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे.

काळ्यापैशाच्या विरोधात सरकारच्या लढाईला यश आलं असून काळ्यापैशाच्या स्विस बँकेतील गोपनीयतेच्या युगाचा सप्टेंबरपासून अस्त होणार असल्याचं प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने म्हटलं आहे. याशिवाय २०१८मध्ये ज्या भारतीयांनी स्विस बँकेतील खाती बंद केली आहेत, त्यांचीही नावं मिळणार असल्याचं सीबीडीटीने म्हटलं आहे. आयकर विभागासाठी सीबीडीटीकडून धोरण बनविलं जातं.

सूचनेचं आदान-प्रदान करण्याची व्यवस्था सुरू होण्यापूर्वी भारतात आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका शिष्टमंडळाने भारताचे महसूल सचिव ए.बी. पांडेय, बोर्ड चेअरमन पी. सी. मोदी आणि बोर्डाचे सदस्य अखिलेश रंजन यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्वित्झर्लंडच्या कर विभागाचे उपप्रमुख निकोल मारिओही उपस्थित होते.

जूनमध्ये लोकसभेत स्टँडिंग कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार १९८० पासून ते २०१०पर्यंत म्हणजे गेल्या ३० वर्षांत भारतीयांनी स्विस बँकेत १७,२५,३०० कोटी रुपयांपासून ते ३४,३०,३०० कोटी रुपये ठेवले असल्याचं म्हटलं होतं. उद्या स्विस बँकेकडून या ब्लॅकमनीची लिस्ट मिळाल्यास नेमका आकडा समजण्यास मदत होणार आहे. रिअल इस्टेट, कोळसा, फार्मासिटीकल, पान मसाला, गुटखा, तंबाखू, कमोडिटी, शिक्षण आणि फिल्म आदी क्षेत्रात सर्वाधिक काळापैसा असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!