Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक मंदीचा केला इन्कार , म्हणाल्या मनोहनसिंग यांची प्रतिक्रिया घेईन …

Spread the love

देशात आर्थिक मंदीवर चर्चा होत असली,  रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी देशात मंदीच्या वृत्ताचा इन्कार करून . मी येथे उद्योग प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आले आहे आणि त्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहे याविषयीच्या सूचना घेण्यासाठी आले आहे, असे त्या म्हणाल्या. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असं विधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता सीतारामन यांनी मंदीचा इन्कार केला.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी अर्थव्यवस्थेतील घसरणीला मोदी सरकारच्या निर्णयांना जबाबदार धरले. याबाबत थेट विचारले असता सीतारामन म्हणाल्या, ‘डॉ. मनमोहन सिंह यांनी राजकीय सूड भावनेतून बोलण्याऐवजी सूज्ञ लोकांशी चर्चा करून उपाय शोधायला नको का? असं काही ते म्हणाले आहेत का? यावर मी त्यांची प्रतिक्रिया घेईन. हेच माझं उत्तर आहे.’

नोकऱ्यांच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, ‘बहुतांश नोकऱ्या संघटित क्षेत्रात निर्माण होतात आणि त्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. बँकांच्या विलीनीकरणानंतर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कोणतीही गदा येणार नाही.’ अर्थसंकल्पाच्या वेळी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीमुळे ऑटोमोबाइल क्षेत्रात घसरण झाल्याच्या मुद्द्यावर सीतारामन म्हणाल्या की सरकार इलेक्ट्रिक वाहनांना उत्तेजन देणं सुरू ठेवणार आहे, पण अन्य वाहनांची किंमत मोजून नव्हे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!