Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ITR Return : तारखेत कोणताही बदल नाही , ” ते ” परिपत्रक ” फेक ” ३१ ऑकटोबर हीच Last Date , आयकर खात्याचा खुलासा

Spread the love

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची तारीख वाढवण्यात आल्याचे एक परिपत्रक प्राप्तिकर विभागाच्या नावाने सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र, हे पत्रक बनावट असून यापूर्वी वाढवून दिलेल्या वेळेतच अर्थात ३१ ऑगस्टपर्यंतच ITR भरणे अनिर्वाय असल्याचे प्राप्तिकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना या बनावट परिपत्रकापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. प्राप्तिकर विभागाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विटद्वारे सांगितले आहे की, सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी)च्या हे लक्षात आले आहे की, ITR भरण्याची तारिख वाढवल्याबाबत एका आदेशाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, हा आदेश नबावट असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आहे, त्यामुळे करदात्यांनी ३१ ऑगस्ट २०१९ च्या आधी ITR भरावा असा सल्ला आम्ही करदात्यांना देत आहोत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!