Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अंतर्वस्त्रामध्ये लपवले २० लाख रुपये , सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून महिला प्रवाशाला अटक

Spread the love

मुंबई विमानतळावर एका परदेशी माहिलेला अटक करण्यात आली आहे. ही महिला आपल्या अंतर्वस्त्रामध्ये २५ हजार युरो (जवळजवळ २० लाख रुपये) लपवून घेऊन जात होती. विमानतळावरील सुरक्षेची जबाबदारी पाहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ‘थाय एअरवेज’ने बँकॉकला जाणाऱ्या रोखायतू ग्यूये नावाच्या महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे, असे या पत्रकामध्ये म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘टर्मिनस टू’वर ही कारवाई करण्यात आल्याचे सीआयएसएफने म्हटले आहे. ‘टर्मिनस टू’ च्या चेक इन गेटजवळ तैनात असणाऱ्या सीआयएसएफच्या महिला शिपाई शिल्पा जैन यांना एक महिला संशयास्पद हलचाली करताना अढळून आली. यावेळी शिल्पा यांनी या महिलेची तपासणी केली असता तिच्या अंतर्वस्त्रामध्ये २५ हजार युरो सापडले.

या महिलेला ताब्यात घेऊन सीआयएसएफने चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी चलन घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला या पैशांबद्दलचा कोणताही कागदोपत्री पुरावा सादर करता आला नाही. त्यानंतर या अटकेची माहिती सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

सीआयएसएफने पुढील चौकशीसाठी या महिलेचा ताबा सीमा शुल्क विभागाकडे देण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!