Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pune : आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुरडीचा खून करणारा विकृत आरोपी गजाआड

Spread the love

वडिल आणि मामा सोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी म्हणून आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन तिचा खून करणाऱ्या विकृत आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. या घटनेत आरोपीने तिला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. प्रथमेश बाबू गायकवाड (वय १९, रा. पुणे स्टेशन) असे अटक केल्या तरुणाचे नाव आहे .

खून झालेल्या बालिकेची आई   रेल्वे रुग्णालयाच्या बाहेर पादचारी मार्गावर झोपली होती. त्यावेळी प्रथमेशने तिला पहाटे अडीचला तिच्या कुशीत निर्धास्त झोपलेल्या बालिकेला उचलून नेले. आयपीए स्टेशन समोरून तो  तिला  यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्यात घेऊन गेला. तेथे तिच्या गालावर चावे घेतले, त्यात तिला मोठ्या जखमा झाल्या, तसेच तिचे डोके आदळल्याने गंभीर जखमी झाली.  रेल्वेचे कर्मचारी डब्याची स्वच्छता  करण्यासाठी  डब्यात गेले असता ही लहान मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी त्वरीत लोहमार्ग पोलिसांना याची देऊन ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डाॅक्टरांनी तिला तपासून मृत  घोषित केले.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, त्यामध्ये संशयित प्रथमेश दिसला. त्याला ताडीवाला रास्ता येथून बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेण्यास घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत  त्याने तिला मारल्याची कबुली दिली. दहीहंडीच्या दिवशी या मुलीच्या वडिलांनी व मामाने प्रथमेशला मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने या चिमुरडीचा  खून केल्याचा धक्कादायक खुलासा केला. यामध्ये तिचा बलात्कार झालेला नाही, असे परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले. या मुलीच्या चेहऱ्या आणि शरिरावर चावा घेतल्याच्या अनेक जखमा आहेत. त्याची तपासणी करण्यासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयातील दंतशास्त्र तज्ज्ञ डाॅ. हरीश पाठक, डॉ. हेमलता पांडे यांना बोलविण्यात आले. त्यावरून ते दाताचे व्रण कोणाचे आहेत, हे तपासले. त्याचा पुरावा म्हणून ही वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे क्वचितच तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो, असे सरदेशपांडे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!