Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंगळसूत्र चोर पुंडलिकनगर पोलिसांच्या जाळ्यात, चोरीची दुचाकी जप्त

Spread the love

औरंंंगाबाद : गारखेडा परिसरातील विद्यानगर येथून महिनाभरापुर्वी मंगळसूत्र चोरी केलेल्या रेकॉर्डवरील चोरट्याला पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारी (दि.२६) गजाआड केले. पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याने नगर जिल्ह्यातील नेवासा येथून दुचाकी चोरी करून तिच्यावर बनावट क्रमांक टावूâन फिरवत होते अशी माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. दरम्यान, मंगळसूत्र चोरट्याचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल उर्पâ राणा बाजीराव सोळुंके (वय २१, रा.न्यु.एस.टी.कॉलनी, शनी मंदिराजवळ, मुवुंâदवाडी) असे मंगळसूत्र चोरट्याचे नाव आहे. तर बॉबी उर्पâ ऋषिकेश झिंझुर्डे असे साथीदाराचे नाव आहे. २० जुलै रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास विद्यानगर येथून महिलेचे मंगळसूत्र चोरी करणारा राहुल उर्पâ राणा सोळुंके हा एमजीएम रूग्णालयाजवळील मोकळ्या मैदानात असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, राजेश यदमळ, नितेश जाधव, प्रविण मुळे, शिवाजी गायकवाड, दिपक जाधव आदींनी सापळा रचून राहुल उर्पâ राणा सोळुंके याला अटक केली. त्यावेळी त्याच्याजवळ सापडलेली दुचाकी नेवासा येथून चोरी केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच दुचाकीचा मुळ क्रमांक (एमएच-१७-एआर-०७१७) हा बदलून त्यावर (एमएच-२०-एआर-०७१७) हा टावूâन चालवत असल्याचे सांगितले.

किरकोळ कारणावरुन पाच जणांची मारहाण 

औरंंंगाबाद : गॉगलचे स्टँड खाली पाडल्याचा जाब विचारताच पाच जणांनी भावंडांना मारहाण केल्याचा प्रकार २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शहाशोक्ता कॉलनी परिसरात घडला. कलीम गफुर कुरेशी (वय ३७) यांनी टपरीवर गॉगल विक्रीसाठी ठेवलेले आहेत. रात्री कुरेशीच्या टपरीवर आलेले मधु विक्रम उमप, सोनू काशिनाथ, आकाश दयानंद हिवराळे, अजीत आणि रुपेश (सर्व रा. मिलींदनगर, उस्मानपुरा) यांनी गॉगल पाहत असताना स्टँड खाली पाडले. त्यामुळे कुरेशीच्या भावाने त्यांना स्टँड खाली पाडल्यावरुन जाब विचारला. त्यावरुन पाचही जणांनी कुरेशीच्या भावाला मारहाणीला सुरूवात केली. यावेळी कुरेशीने धाव घेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मधु उमपने फायटरने कुरेशीच्या डोक्यात देखील वार केला. यानंतर पाचही जणांनी तेथून धुम ठोकली. याप्रकारानंतर रविवारी कुरेशीने सातारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास जमादार पदार करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!