Uttar Pradesh : मोदींच्या विरोधात पोस्ट करणे पडले महागात , पोलीस उपनिरीक्षक निलंबित

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्ट लिहिणं उत्तर प्रदेशातील एका पोलीस उपनिरीक्षकाला महागात पडलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. भगवान प्रसाद असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. त्याची पोस्टिंग अँटी सबोटाज टीममध्ये होती. फेसबुकवर तो वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहित असल्याच्या तक्रारी पोलीस खात्याकडे आल्या होत्या. पोलीस दलातील सोशल मीडिया सेलचेही त्याच्याकडे लक्ष होते.

Advertisements

सोशल मीडिया सेलनेही त्याच्याविरोधात एसपी राम बदन सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. सिंह यांनी स्वत: भगवान प्रसाद यांचं फेसबुक अकाउंट पाहिलं होतं. त्यात त्याने मोदींविरोधात लिखाण केल्याचं आढळून आलं. तसेच मोदींविरोधातील कोणताही मजकूर तो लाइक आणि शेअर करत असल्याचंही दिसून आलं होतं. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या त्याला दोषी धरून निलंबित करण्यात आलं असून त्याच्या सखोल चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी झाल्यानंतर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आपलं सरकार