Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अरुण जेटली : मोहन भागवत, अरविंद केजरीवाल , पासवान यांची ‘एम्स’ला भेट , रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही

Spread the love

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज दिवसभर नेत्यांची एम्समध्ये रीघ लागली होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रामविलास पासवान यांच्यासह अनेक नेत्यांनी आज एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांच्या प्रकृतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे ९ ऑगस्टला सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जेटली यांच्या प्रकृतीबद्दल ‘एम्स’ रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सहा महिन्यांपूर्वी जेटलींना कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर अमेरिकेत त्यांच्यांवर उपचार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. लठ्ठपणामुळे जेटलींनी बॅरिएटीक सर्जरीही केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!