Aurangabd Crime : आई-वडीलांना धमकावण्यासाठी गावठी पिस्तूल घेवून फिरणारा गजाआड, पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : संपत्ती वाटुन न देणा-या आई-वडीलांना धमकावण्यासाठी गावठी पिस्टल घेवून फिरणा-यास पुंडलिकनगर पोलिसांनी गजाआड केले. गावठी पिस्टल घेवून फिरणा-याच्या ताब्यातून पोलिसांनी गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. राहुल ऊर्फ लाल्या पंडीत पिंपळे (वय ३३, रा.पंचशिलनगर, राजनगरच्या बाजूला, बीड बायपास ) असे पिस्टल घेवून फिरणा-याचे नाव असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी शनिवारी (दि.१७) दिली.

Advertisements

मुकुंदवाडी  रेल्वेस्टेशन परिसरातील विश्रांतीनगर येथील गल्ली नंबर ३ मध्ये एक जण गावठी पिस्टल घेवून फिरत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना १६ ऑगस्ट रोजी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे, राजेश यदमळ, रवि जाधव, नितेश जाधव, दिपक जाधव, शिवाजी गायकवाड, गणेश डोईफोडे, विठ्ठल फरताळे आदींनी विश्रांतीनगर भागात सापळा रचून राहुल उर्पâ लाल्या पिंपळे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान राहुल पिंपळे याने आपले वडील पंडीत पिंपळे व आई गंगुबाई पंडीत पिंपळे हे विश्रांतीनगर येथे राहतात, परंतु ते संपत्ती वाटुन देत नसल्याने त्यांना धमकी देण्यासाठी गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूसे बाळगत असल्याचे सांगितले.

दरम्यान, राहुल ऊर्फ  लाल्या पिंपळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द पुंडलिकनगर, जवाहरनगर, मुवुंâदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आपलं सरकार