Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सिने अभिनेता अक्षय कुमारला का आठवते शिवाजी महाराज ?

Spread the love

कोल्हापूर आणि सांगलीत पूर ओसरला असला तरी नव्याने पुन्हा एकदा आपला संसार उभं कऱण्याचं आव्हान पूरग्रस्तांसमोर आहे. पूरग्रस्तांसाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सगळेच मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जाणारा तसंच समाजकार्यात नेहमीच पुढे असणारा बॉलिवूड अभिनेता यानं देखील सांगली आणि कोल्हापूरकरांसाठी एक खास संदेश पाठवला आहे.

पूरग्रस्तांना संदेश देताना अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत संकटांशी लढण्याची शिकवण त्यांच्याकडून मिळाली असल्याचं म्हटलं आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे खूप नुकसान झाले आहे. तुम्ही सर्वांनी धीर धरा असं मी आवाहन करतो. लढणं आणि पुढे जाण्याची शिकवण आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून घेतली आहे, असं अक्षय कुमारनं म्हटलं आहे. तसंच सरकार आणि कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन ग्रूप तुमची प्रत्येक मदत करण्यासाठी तत्पर आहे. मला विश्वास आहे की तुमचं शहर, जिल्हा, गल्ली, आधीपेक्षा सुंदर आणि चांगलं करतील, असंही अक्षय कुमारनं म्हटंलय. अक्षय कुमारने व्हिडिओतून हा संदेश पाठवला असून या व्हिडिओनंतर सोशल मीडियावरून अक्षय कुमारचं कौतुक करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!