Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मिशन काश्मीर आटोपून अजीत डोवाल बॅंक टू दिल्ली !!

Spread the love

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काश्मीरमधील ११ दिवसांच्या मुक्कामानंतर आज दिल्लीत परतले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर या निर्णयामागची केंद्राची भूमिका काश्मिरींना समजावून सांगण्यासाठी, त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी तसेच काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी डोवल यांनी काश्मीरमध्ये तळ ठोकला होता.

अजित डोवल यांना ६ ऑगस्ट रोजी ‘मिशन काश्मीर’वर पाठवण्यात आलं होतं. तिथे जाताच त्यांनी सर्वप्रथम सुरक्षेचा तपशील घेतला व विकासकामांबाबतही कानोसा घेतला. सर्वाधिक दहशतवादी कारवाया झेलणाऱ्या शोपियान जिल्ह्यात डोवल यांनी फेरफटका मारला. काही भागांमध्ये पायी चालून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला.

डोवल यांचे काही फोटो व व्हिडिओही माध्यमांत झळकले होते. मागे दुकाने बंद आहेत आणि डोवल स्थानिकांसोबत जेवत आहेत, असे एका व्हिडिओतील दृश्य होते तर अन्य व्हिडिओत ‘नवीन प्रशासन व्यवस्था अस्तित्वात येताच सर्व काही बदलेल’ अशा शब्दांत ते स्थानिकांना आश्वस्त करताना दिसले. हे ठिकाण नेमके कोणते हे मात्र उघड करण्यात आले नव्हते.

डोवल यांनी काश्मीरमध्ये पोलीस, सीआरपीएफ, लष्करातील जवान यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधला तसेच त्यांना मार्गदर्शनही केले. हिंसाचारग्रस्त भागांत डोवल यांनी शांततेचं महत्त्व अधोरेखित केलं तसेच सुरक्षेबाबतही ठळक बाबी सांगितल्या. काश्मीरमध्ये हिंसक घटना घडू नयेत. जीवित व वित्तहानी टळावी. त्याचबरोबर जवानांचे मनोबल वाढावे, हा उद्देश डोवल यांच्या काश्मीर मुक्कामामागे होता आणि तो साध्य झाला आहे, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!