पाकिस्तानातील भारतीय उच्च आयुक्तालयातही  उत्साहात साजरा झाला भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन सोहळा

Spread the love

जम्मू काश्मीरमधील ३७० वरून सध्या भारत-पाक मधील संबंधात तणाव निर्माण झालेला असला तरीही आज पाकिस्तानात देखील भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगामध्ये भारतीयांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला व एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisements

भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिना निमित्त भारतीय दूतावासांनी पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगात ध्वजारोहन करण्यात आले . तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव अहुवालिया यांनी करुन त्यांनी सर्वांसमोर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवला.

दरम्यान स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केले. आजच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण साधारण ४५ मिनिटे चालले. ज्यात त्यांनी कलम ३७०, तिहेरी तलाक विधेयक, चांद्रयान, अर्थव्यवस्था, लष्कर, पर्यावरण, स्वच्छ भारत यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

आपलं सरकार