स्वातंत्र्य दिन सोहळा शांततेत पार पडावा म्हणून लाल किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त , आज मोदी सहाव्यांदा फडकावतील तिरंगा

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या १५ ऑगस्ट रोजी सहाव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित करणार आहेत. अभूतपूर्व बहुमत मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदींचं लाल किल्यावरचं हे पहिलंच भाषण असेल. या भाषणाबरोबरच माजी पंतप्रधान, दिवंगत अटलबिहारी वाजपेयींनंतर लाल किल्यावरून सलग सहाव्यांदा भाषण करणारे मोदी हे भाजपचे दुसरे नेते ठरणार आहेत.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या या भाषणात सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच भविष्यातील संकल्पही देशवासीयांपुढे मांडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरबाबत घेतलेला ऐतिहासिक निर्णय, तीन तलाक आणि अर्थव्यवस्थेबाबतही ते भाष्य करण्याची शक्यता आहे. १९९८ ते २००३ पर्यंत सलग सहाव्यांदा लाल किल्यावरून भाषण करणारे वाजपेयी हे भाजपचे पहिले नेते होते. आता २०१४पासून सत्तेत आलेले मोदी उद्या ही किमया साधणार आहेत.

Advertisements
Advertisements

उद्याच्या भाषणात मोदी आरोग्य, पाणी, भ्रूण हत्या आणि स्वच्छता आदी विषयांवरही भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरांचा उल्लेखही त्यांच्या भाषणातून ऐकायला मिळेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान, उद्या लाल किल्यावर होणाऱ्या या भाषणावेळी दिल्लीतील ४१ सरकारी शाळांमधील ३५०० विद्यार्थी, ५ हजार प्रेक्षक मुलं आणि १७ शाळांमधील ७०० एनसीसी कॅडेटही उपस्थित राहणार आहेत.

ध्वजारोहण प्रसंगी मोदींच्या सोबत भारतीय वायुसेनेच्या  3 महिला अधिकारी असतील.  फ्लाइंग ऑफिसर प्रीतम सांगवान पीएम मोदी यांना राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी मदत करतील तर फ्लाइट लेफ्टिनेंट ज्योति यादव और फ्लाइट लेफ्टिनेंट मानसी गेदा पीएम मोदींच्या  दोन्ही बाजूंना उभ्या राहतील.

संरक्षण मंत्रालयाने या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले कि , या सोहळ्यात ४१  शासकीय शाळेतील ३५०० विद्यार्थी , ५००० इतर शाळातील विद्यार्थी १७ शाळांमधील ७०० एनसीसी  कैडेट, मोदींच्या भाषणाच्या वेळी  ‘नया भारत’ अशी शाब्दिक रचना करतील आणि  ‘एकता में मजबूती’ असा संदेश देतील.  पंतप्रधांना सलामी देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकात एक अधिकारी आणि  सेना, नौसेना आणि  वायुसेनेच्या  24 .24 जवानांचा समावेश राहील. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, त्यांचे सहयोगी मंत्री श्रीपद यसोनाइक, सेना प्रमुख बिपिन रावत, वायुसेना प्रमुख मार्शल बिरेन्द्र सिंह धनोआ और नौसेना प्रमुख एडमिरल कर्मबीर सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतील.

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा शांततेत पार पडावा म्हणून स्थानीक पोलीस , सुरक्षा कर्मचारी , वाहतूक , राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (एनएसजी), सेना आणि  एसपीजी कमांडो  तैनात करण्यात आले आहेत. आकाशातही वायुसेनेच्या पहारा असणार आहे.  लाल किल्ल्याच्या परिसरातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वत्र  सीसीटीवी कॅमेरे लावण्यात आले आहेत. परिसरातील इमारतीच्या छतांवर बंदूकधारी सैनिक तत्पर ठेवण्यात आले आहेत.

आपलं सरकार