पूरग्रस्तांचे पुनर्वसन विक्रमी वेळेत पूर्ण करून त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद आणू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्र सरकारने सहा हजार आठशे कोटी रुपयांचे पॅकेज तयार करून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं कार्य अतिशय गतीनं व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पूरग्रस्तांचे पुनर्वसन विक्रमी वेळेत पूर्ण करून त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्रवासियांना संबोधित करताना दिलं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळं पूरस्थिती निर्माण झाली. गेल्या दहा पंधरा दिवसांत राज्य सरकार, विविध संघटना, संस्था, विशेषतः भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ आदींनी प्रचंड मेहनत करून, अहोरात्र परिश्रम करून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याचं काम अव्याहतपणे केलं. जवळपास पाच लाखहून अधिक नागरिकांना वाचवण्याचं काम यशस्वी करू शकलो याचा आनंद आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Advertisements

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. पुरामुळे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. ज्यांच्यासमोर आपल्या भविष्याची चिंता आहे; अशा नागरिकांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून अतिशय कमी वेळात त्यांना उभं करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करावं लागेल. पूरग्रस्तांच्या पाठिशी उभं राहणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजप सरकारच्या काळात केलेल्या कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मागील पाच वर्षात महाराष्ट्र सरकार सामन्यांच्या पाठिशी उभे राहिले. शेतकरी, शेजमजूर, महिलांसह सर्व घटकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. शेती क्षेत्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने केली. ५० हजार कोटी रुपये विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. जलयुक्त शिवार योजनेतून महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Advertisements
Advertisements

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील जनतेनं, शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या यातना भोगल्या आहेत. त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा येईल, असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सोडला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात भक्कम अर्थव्यवस्था आहे. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील थेट विदेशी गुंतवणुकीत एकट्या महाराष्ट्राचा वाटा ५० टक्क्यांच्या जवळपास आहे, अशी माहिती त्यांनी दिली. विविध योजनांच्या माध्यमातून वंचितांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचं स्वप्न गेल्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांना सोबत घेऊन हा महाराष्ट्र पुढे चालला आहे, असंही ते म्हणाले.

आपलं सरकार