Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दरोड्याच्या तयारीतील तिघांना ठोकल्या बेड्या, हा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना कळवा

Spread the love

अशा वर्णनाचा इसम औरंगाबाद शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी मिळून आल्यास क्राईम ब्रँच औरंगाबाद शहर येथे संपर्क साधावा सदर इसमाचे  वय अंदाजे 35 वर्षे असावे  असे कळविण्यात आले आहे. संपर्कासाठी मोबाईल नंबर ९८२३५८०९९९/०२४० २२४०५००


औरंगाबाद – बुधवारी (आज)दुपारी ३च्या सुमारास, हनुमान टेकडी परिसरात बेगमपुरा पोलिस गस्तीवर असतांना एका रेकाॅर्डवरच्या गुन्हागारा सहित अन्य दोघांकडून जांबिया, फायटर, मिरची पुड, मोठी दोरी असे दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करंत तिघांना बेड्या ठोकल्या.तर दोघे पोलिसांना पाहून पळून गेले.
आमेर शेख रफीक शेख(२३)तोशिफखान मकसूदखान(२३)जावेदखान कैसरखान(२२) सर्व रा.किराडपुरा अशी अटक आरोपींची नावे आहेत.यातील आमेर हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे.अटक आरोपींनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची तयारी करंत असल्याची कबुली दिली आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.वरील कारवाई पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद आणि पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय सय्यद सिद्दीक,पोलिसकर्मचारी देवा सूर्यवंशी, सुनेश कुसाळे, ज्ञानेश्वर ठाकूर नामदेव सानप, नागेश पांडे यांनी पार पाडली.

मोटरसायकल चोर अटकेत,दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – स्वता:च्या अल्पवयीन मुलाला लग्नसमारंभातून महागडे मोबाईल चोरण्यास लावणार्‍या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराला जिन्सी पोलिसांनी १लाख ४३ हजारांच्या मुद्देमालासह अटक केली.
अरुण भास्कर आपार(३७) रा. हडको एन१२ असे अटक आरोपीचे नाव आहे.पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना मंगळवारी खबर्‍याकडून माहिती मिळाली की, जिन्सी हद्दीतील सावरकर चौकात एक चोरटा मोटरसायकल विक्रीसाठी येत आहे. त्यानुसार जिन्सी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात आरोपी अरुण आपार अडकला त्याने दोन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली.तसेच साखरे मंगल कार्यालय आणि माशाअल्ला फंक्शन हाॅल मधून १लाखांचे मोबाईल स्वता:च्या मुलाकरवी चोरले.वरील चोरट्याकडून दोन मोटरसायकल आणि मोबाईल असा १लाख ४३ हजार ९०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरील कारवाई पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे,पीएसआय दत्ता शेळके, सहाय्यक फौजदार धनेधर, हवालदार हारुण शेख, यांनीपार पाडली\

शहरातुन तीन दुचाकी लंपास

औरंंंगाबाद : शहरातील दुचाकी चोरीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. चोरट्यांनी विविध परिसरातून तीन दुचाकी लंपास केल्या असून या प्रकरणी संबधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा परिसरातील सावित्री नगरात राहणाNया प्रशांत भगवान म्हस्के यांनी राणाजी मंगल कार्यालयासमोर दुचाकी (क्र. एमएच २० डीपी ६८८६) उभी केली असताना चोरट्याने हॅण्डल लॉक उघडून चोरून नेली.  दुसरी घटना हर्सूल परिसरातील सहयोग नगरात घडली. आनंद साबळे यांनी घरसमोर दुचाकी (क्र.एमएच २० डीवाय ९७७०) उभी केली असता चोरट्याने चोरून नेली. संतोष नामदेव शेळके (४२) यांनी आपल्या घरसमोर दुचाकी (एमएच २० एव्ही २८८८) उभी केली होती. चोरट्याने ती दुचाकी चोरून नेल्याची तिसरी घटना भोईवाड्यात घडली. या प्रकरणी सिडको, हर्सूल आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरात घुसून महिलेवर बलात्कार

औरंंंगाबाद : वाळूज परिसरातील नेहरी येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय महिलेवर भगवान बबन अंबाडे (रा.नेहरी, ता.गंगापूर) याने घरात घुसून बलात्कार केला. पीडित महिला ९ जुलै रात्री १० वाजता घरासमोर मिश्री लावत थांबली असतांना भगवान अंबाडे याने तुला बोलायचे आहे असे म्हणत तिच्या घरात शिरला. त्यानंतर अंबाडे याने पीडित महिलेचे तोंड दाबून बेडरूममध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून भगवान अंबाडे याच्याविरूध्द एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास उपनिरीक्षक फड करीत आहे.

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

औरंंंगाबाद : अकबर सलीम शेख रा. उस्मानपुरा यांचे लग्न झाले होते. गेल्या चार वर्षांपासून मेडीकलचे दुकान सुरु करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक व शाररिक छळ केला जात होता. विवाहितेच्या  तक्रारीवरुन  बेगमपूरा पोलीस ठाण्यात अकबर सलीम  शेख, सर्पâराज शेख अब्दुल सत्तार आणि दोन महिला सह चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!