It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

Uttar Pradesh : आता रस्त्यावर “नो नमाज , नो आरती” , लखनौ पोलीस महासंचालकांचे आदेश

Spread the love

उत्तर प्रदेश सरकारने रस्त्यांवर नमाज पढण्यास  आणि आरती करण्यास  मज्जाव केला आहे. लखनौ पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी हे आदेश काढले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कोणतंही कार्य करता येणार नाही. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होतं.

डीजीपी सिंह पत्रकारांशी बातचीत करताना म्हणाले, धार्मिक ठिकाणी जेव्हा नमाज पठण करणं किंवा आरती करण्याची व्यवस्था केली जाते, त्यासाठी कोणतीही व्यक्ती रस्त्यावर येता कामा नये. नमाज पठण करणं किंवा आरती करण्यासाठी रस्ते वाहतुकीचा खोळंबा होता कामा नये, असंही सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच हे नियम उत्तर प्रदेशातल्या सर्वच जिल्ह्यांना लागू असल्याचं ते म्हणाले आहे.

एक बैठक बोलावून सौहार्दपूर्ण वातावरणात अशा प्रकारची कारवाई केली जाईल. मला वाटतं की आमचा हा प्रयोग यशस्वी होईल. दुसरीकडे राज्यातील अलिगड आणि मेरठ जिल्ह्यांतील पोलीस प्रशासन कडक पावलं उचलत रस्त्यांवर धार्मिक कार्यक्रम करण्यावर पूर्णतः बंदी घातली आहे.

Leave a Review or Comment

आपलं सरकार