It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभर कडेकोट सुरक्षा

Spread the love

उद्या भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मुंबई, दिल्लीसह देशातील प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर दहशतवादी संघटना भारतात स्वातंत्र्य दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली होती.

आयबीच्या इशाऱ्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणाने गुजरात पोलिसांना दिला आहे. स्वातंत्र्य दिनी घातपात घडवण्यात येण्याची शक्यता असल्याने सर्व तपास यंत्रणांनी सतर्क राहावे असे आयबीने म्हटले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर जावून कसून तपासणी केली.

Leave a Review or Comment